फीट राहण्यासाठी 1 तासाचे 21 हजार मोजते ही अभिनेत्री
पाहा नेमकं काय केलं?
मुंबई : नवीन वर्ष सुरू झालं की नवीन संकल्प समोर येत असतात. कुणी आपल्या आवडीनिवडी जोपासत असतं तर कुणी आपल्या शरिराची काळजी घेत असतं. अशीच काळजी गायिका - अभिनेत्री सेलेना गोमेजने आपल्या शरिराची घेत आहे. गेल्यावर्षी तिने आपल्या फिटनेसकरता एवढे रुपये खर्च केले आहेत.
सेलेना आपल्या फिटनेसवर जवळपास 300 डॉलर प्रति तास खर्च करते. वेबसाइट 'ईआॉनलाइन डॉट कॉम'च्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सेलेनाला आपल्या स्वास्थात खूप चढ-उतार पाहायला मिळाले.
ल्यूपस आणि किडनी प्रत्यारोपणाकरता चिंता आणि डिप्रेशनमुळे तिला रूग्णालयात देखील दाखल व्हावं लागलं. 26 वर्षीय ही गायिका गेल्या महिन्यात आपल्या घरी आली आहे.
आता ती घरी आली असून तिला चांगल वाटत आहे. सेलेना आता परिवारासोबत वेळ घालवत असून तिला मित्र-मैत्रिणींची खूप साथ आहे. ती लवकरच तिचं रूटीन फॉलो करेल.
लॉस एंजिल्समध्ये 300 डॉलर तिने एका तासासाठी खर्च केले आहेत. खाजगी ग्राहकांसाठी प्रशिक्षकांवर जवळपास 125 डॉलर प्रति तास उपलब्ध असतात. त्यांच्यावर देखील खर्च केले आहेत.
सेलेना आपल्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. पहिला बॉयफ्रेंड जस्टिन बीबरसोबत ब्रेकअप केल्यानंतर सेलेनाने डीजे जेडला डेट करायला सुरूवात केली होती.
एवढंच नाही तर 2008 मध्ये सेलेना गोमेजचा निक जोनससोबत देखील अफेअर सुरू होतं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. काहीच महिन्यानंतर अगदी 2009 मध्येच हे दोघं वेगळे झाले.