मुंबई : आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यावेळी त्या व्यक्तीकडून आपल्याही काही अपेक्षा असतात. पण, प्रत्येक वेळी त्या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही. मागील बऱ्याच वर्षांपासून टेलिव्हिजन विश्वात गाजलेल्या अभिनेत्री कनिष्‍का सोनी (Kanishka Soni) हिच्यासोबतही असं घडलं. प्रेमाच्यात नात्यात नशिबानं साथ दिली नसल्यामुळं ती पुरती खचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यावर झालेला आघात पचवत, त्यातून सावरत काही दिवसांपूर्वीच तिनं आपण स्वत:शीच लग्न केल्याचं जाहीर केलं. कनिष्कानं तिच्या जीवनातील एक असं नातं जगासमोर आणलं, जे पाहून अनेकांनाच धक्का बसला. 


एका मुलाखतीदरम्यान, आपल्याला प्रेमाच्या बाबतीत नशिबाची साथ कमीच मिळाली असं तिनं स्पष्ट केलं. 'मी मुंबईत आले, तेव्हा बऱ्याच मुलांनी मला प्रपोज केलं. आतापर्यंत मी एक 1200- 1300 प्रपोजल नाकारले आहेत. एका लोकप्रिय अभिनेत्यानंही मला प्रपोज केलं होतं, लग्नासाठी. पण, फार कमी काळातच त्याचा खरा चेहरा समोर आला, तो अतिशय हिंसक होता', असं ती म्हणाली. 


आपला प्रियकर अतिशय रागीट स्वभावाचा होता असं सांगत दर पंधरा मिनिटांनी त्याला राग यायचा, तो हात उगारायचा असं तिनं सांगितलं. राग आल्यानंतर वस्तूंची तोडफोड आणि प्रियकराकडून कनिष्काला सततची होणारी मारहाण ही परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नव्हती. 


आयुष्यात एकाच व्यक्तीला जोडीदार म्हणून साथ द्याची असं कनिष्का म्हणायची खरी. पण, या नात्यात ती चुकली होती. त्याची ही विकृत वृत्ती तिला असद्य वेदना देत होती. अडीच वर्षांपर्यंत हे असंच सुरु होतं. या आघातातून सावरण्यासाठी तिला पाच वर्षांचा काळ गेला होता. 



कास्टिंग काऊचनंही पाठ सोडली नाही... (Casting Couch)
खासगी आयुष्यात वादळ आलेलं असताना कामावर लक्ष केंद्रीत करावं तर तिथेही कनिष्काला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. निर्माते आणि दिग्दर्शकांकडून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. कास्टिंग काऊचच्या या अनुभवानंही ती हादरली होती.