मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची म्हणजेच बाळराजेंची भूमिका साकारणाऱ्या दिवेश मेदगे याच्यावर सध्या अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. निमित्त आहे ते म्हणजे दहावीच्या शालान्त परीक्षेत त्यानं संपादन केलेलं यश.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेमध्ये संभाजी राजांची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा एक खास पोस्ट लिहित दिवेशला शिवमय शुभेच्छा दिल्या. 'स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेतील बाळराजे साकारणारे.चि.दिवेश मेदगे याला #sscboard परीक्षेत ९०.६०% मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छा.!', असं त्यांनी लिहिलं. 


दिवेशच्या या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती होताच लगेचच चाहत्यांनीही त्याला शभेच्छा देण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे शुभेच्छा देत असताना कित्येकांनी त्याचा उल्लेख 'बाळराजे' असाच केला. हे पाहता दिवेशनं साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, हेच स्पष्ट झालं. 


स्वराज्य रक्षक संभाजी मालीकेतील बाळराजे साकारणारे.चि.दिवेश मेदगे याला #sscboard परीक्षेत ९०.६०% मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छा.!

Posted by Dr.Amol Kolhe on Wednesday, July 29, 2020


दरम्यान, दहावीच्या निकालांविषयी सांगायचं झाल्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर त्यामागोमागच आता दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. या वर्षीसुद्धा परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.