ऑनस्क्रीन विकते पापड- लोणची; ऑफस्क्रीन मात्र करोडोंचा व्यवसाय, पाहा `माधवी भिडे`ची कमाल
आहे त्यात आनंदी असणाऱ्या माधवीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं प्रत्येक पात्र आपला खास ठसा सोडून जातं. आपलं वेगळेपण सिद्ध करून जातं. असंच एक पात्र म्हणजे गोकुळधाम सोसायटीच्या सेक्रेटरी भिडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत असणाऱ्या माधवी भिडे.
सोनालिका जोशी या कित्येक वर्षांपासून माधवी साकारत प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. लोणची आणि पापडची विक्री करत आपला संसार चालवणाऱ्या आणि आहे त्यात आनंदी असणाऱ्या माधवीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पण, प्रत्यक्ष आयुष्यात हीच माधवी म्हणजेच सोनालिका लोणची पापड नव्हे, तर एक अत्यंत मोठा व्यवसाय सांभाळत आहे.
जेठालालने जीम शिवाय घटवलं 10 किलो वजन, कसं तुम्हीच पाहा
अभिनयासोबतच सोनालिका डिझायनिंग आणि व्यवसाय क्षेत्रात सक्रीय आहे. खऱ्या आयुष्यात ती कोट्यवधींची मालकीण आहे. मालिकेमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीरेखा साकारणाऱ्या सोनालिकाकडे आलिशान घर आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या कारही आहेत. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. जिथं कायमच ती ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.