मुंबई : काही मालिकांना सातत्यानं लोकप्रियता मिळाली आहे. अशाच मालिकेपैकी एक म्हणजे 'मालगुडी डेज'. दूरदर्शनवर लागणाऱ्या या मालिकेच्या माध्यमातून कायमच काही अशी पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली, ज्यांनी सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील सर्वांच्या आवडीचं पात्र होतं, 'स्वामी' या लहानग्या मुलाचं. स्वामीच्या बालपणीचे दिवस आठवून अनेकांनीच आपलं बालपणही त्याच्याशी जोडी पाहिलं होतं. 


आजही 'मालगुडी डेज' या मालिकेची व्ह्यूअरशीप पाहिली असता मालिकेमधील स्वामी आणि त्याच्या मित्रांचाच भाग सर्वाधिक वेळा पाहिला जातो.


धोतर, झब्बा, टोपी, हातात पाटी, पिशवी, शाळेचं दप्तर अशा एकंदर रुपात सर्वांसमोर येणाऱ्या या स्वामीची भूमिका साकारली होती, अभिनेता मास्टर मंजूनाथ यांनी. 


अचानकच या स्वामीची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे तो सध्या काय करतो, कसा दिसतो याचं उत्तर काहींना मिळालं आहे. 


मास्टर मंजुनाथचा एक नवा फोटो सर्वांच्या भेटीला आला आहे. त्याच्यामध्ये झालेला बदल पाहून सर्वजण अवाक् होत आहेत. 


सूत्रांच्या माहितीनुसार मास्टर मंजनाथ सध्या त्याच्या कुटुंबासमवेत बंगळुरू येथे स्थायिक आहे. तिथं एका पीआर कंसल्टंट पदावर तो कार्यरत आहे. 


काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मंजुनाथनं आयटी कंपनीतील नोकरी स्वीकारली. 



'मालगुडी डेज' मध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मंजुनाथ अवघ्या तीन वर्षांचा होता. त्यानं कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 


वयाच्या 19 व्या वर्षी अभिनयातून काढता पाय घेत त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं होतं.