मुंबई : कितीही चांगला मित्र असो किंवा मैत्रीण असो, मुद्दा जेव्हा काही अती खासगी विषयांचा असतो तेव्हा मात्र त्यावर बोलताना प्रचंड संकोलचेपणा वाटतो. अनेकदा तर, या मुद्द्यांवर बोलणंही टाळलं जातं. म्हणजे समस्या कितीही मोठी असो, त्यावर उघडपणे कसं बोलणार, या एका विचारानेच पाय मागे घेतला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्या असतात शारीरिक संबंधांशी निगडीत. अनेकांसाठी न्यूनगंडाचा विषय असणाऱ्या याच मुद्द्यावर भाष्य करणारी काही मंडळी तुमच्या भेटीला आली आहेत. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. (SEX problems Dr Arora Gupt Rog Visheshagya trailer goes viral)


हा व्हिडीओ आहे, 'डॉ. अरोरा गुप्त रोग विशेषज्ञ' (Dr Arora- Gupt Rog Visheshagya) यांचा. ही नवीकोरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या सीरिजमध्ये भिनेता कुमुद मिश्रा  (Kumud Mishra) मध्यवर्ती भूमिकेत दिसत आहेत. 


काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जिथं सेक्ससंदर्भातील अनेक प्रश्न घेऊन त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी काही पात्र त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे डॉक्टर कमाल सामंजस्य आणि संयम दाखवतात असं पाहायला मिळलं. 



'जब तक गुप्त रहेगा, तब तक रोग रहेगा।'  अशी टॅगलाईन असणारी ही सोनी लिव्हची ही सीरिज 22 जुलैपासून प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या कलाकृतीचा विषय पाहता आता तिला प्रेक्षकांची पसंती कोणत्या स्तरावर नेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.