Shabana Azmi Shares Old Photo With Dharmendra: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे Rocky Aur Rani Ki Prem Kahani या चित्रपटाची. हिंदी सिनेमा हा बराच पुढे गेला आहे, आता येथे आपल्याला काळाच्या पुढचे विचार पाहायला मिळतात. त्यामुळे सध्या आधुनिक विचारांच्या जगात चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला काही धक्कादायक पाहायला मिळणं हे आजच्या प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही असा सूर असलेला दिसतो. यावेळी चर्चा रंगली ती शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनची. हा सीन चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांतच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि प्रेक्षकांकडून याभोवती नाना तऱ्हेच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसल्या त्यातून अनेकांनी मात्र या किसिंग सीनवर आक्षेप घेत त्यांना ट्रोल केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवरून याविषयी चर्चा पिकायला लागली होती. त्यामुळे दिग्गज अभिनेत्यांना करण जोहरच्या चित्रपटातून लिपलॉक किसिंग सीन देताना पाहणं हे अनेकांसाठी निर्बुद्धपणाचं लक्षणं होतं. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यातून ज्या काळी व्यावसायिक सिनेमांचा ट्रेण्ड होता. त्याकाळात शबाना आझमी, स्मिता पाटील, नसिरूद्दीन शहा, ओम पुरी अशा कलाकारांनी समांतर चित्रपटांतून तेवढ्याच ताकदीचे काम केले आणि प्रेक्षकांना त्यातूनही वास्तवदर्शी चित्रपट देत अधिक सुजाण केले. त्यावेळी समांतर चित्रपटांची ओढ आणि किमया कायमच राहत त्यांनी विविधांगी विषय प्रेक्षकांसमोर आणले. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत त्यांचा मोलाचा असा वाटा आहे. 


हेही वाचा - प्राजूचा वाढदिवस; समीर चौगुलेचं औक्षण, 'हास्यजत्रा'च्या टीमची जंगी पार्टी पण खास व्यक्ती होती गायब


आजचं युग हे अधिक डिजिटल आहे आणि आता चित्रपट व्यवसायात ओटीटी हे माध्यमं आले आहे. सोबतच आता चित्रपटांची व्यावसायिक गणितंही बदलली आहे. परंतु या सीनवरून सोशल मीडियावर कितीही गदारोळ झाला असला तरी प्रेक्षक म्हणून या दोन्ही कलाकारांच्या प्रती आपल्या सर्वांनाच तितकाच आदर आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र या चित्रपटातून 80 व्या वर्षीही तितकेच हॅण्डसम आणि एवरग्रीन दिसत आहेत. त्यातून त्यांच्या अभिनयानं आजही आपल्या अंगावर शहारे येताता. गंभीर अभिनयात डोळ्यात पाणीही येते. पहिल्यासारखे ते नाचू किंवा अॅक्शन सीन आज जरी करू शकत नसेल तरी त्यांच्या अभिनयानं त्यांनी लाखोंची मनं जिंकून घेतली आहेत. 



सध्या शबाना आझमी यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक गोड फोटो शेअर केला आहे. जो त्यांच्या आणि धर्मेंद्र यांचा आहे. हा चित्रपटाच्या एका शुटिंगच्या वेळचा फोटो असावा. शबाना आझमी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'' 'रॉकी रानी' चित्रपटातील कानवलीजी आणि जानिमी तेव्हा नक्कीच भेटले असतील. हा फोटो आहे 'मर्दोंवाली बात' या चित्रपटातला'', असं म्हणतं त्यांनी करण जोहरला टॅग केले आहे.