मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीची (Shabana Azmi) आई शौकत कैफी (Shaukat Kaifi) यांच शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं आहे. मुंबईच्या राहत्या घरी कार्डिअक अरेस्टमुळे त्यांच निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शौकत कैफी यांच वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून शौकत कैफी आजारी होत्या. त्या शबाना आजमी और बाबा आजमी यांच्याकडे राहत होत्या. शौकत कैफी यांनी प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार कैफी आजमी यांच्यासोबत लग्न केलं. कैफी आजमी यांच 2002 मध्ये मुंबईत निधन झालं. 



शौकत कैफी यांच्या निधनाची बातमी त्यांचे जावई लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटरवरून दिली. शौकत कैफी यांनी  'बाजार', 'उमराव जान', 'गरम हवा' आणि 'मीरा नायर' 'सलाम बॉम्बे' या सिनेमात काम केलं आहे. त्यांचा शेवटचा सिनेमा हा 'साथिया' होता. या सिनेमात त्या आत्याच्या भूमिकेत दिसल्या. 


शौकत आणि कैफ यांची प्रेमकथा लोकप्रिय असून 'कैफी आणि मी' या पुस्तकात लिहिलेली आहे. एवढंच नव्हे तर शबाना आजमी यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत ही प्रेमकथा मंचावर साकारली होती. यात शबाना यांनी शौकत यांची भूमिका तर जावेद अख्तर यांनी कैफी यांची भूमिका साकारली होती.