Shahrukh Khan Highest Tax Payer : कलाकर हे दरवर्षी कोटींच्या घरात टॅक्स भरताना दिसतात. तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सगळ्यात जास्त आयकर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान ते शाहरुख खान देखील आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त आयकर भरला आहे. अभिनयापलिकडे शाहरुख हा एक बिझनेसमॅन देखील आहे. आता फॉर्च्युन इंडियानं फायनॅनशिल ईयर 2023-24 मध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. तर रिपोर्ट्सनुसार, शाहरुखनं काही 5-10 कोटी नाही तर तब्बल 92 कोटी आयकर भरल्याचे म्हटले जाते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखचं नाव या यादित पहिल्या स्थानावर यासाठीच आहे. कारण तो फक्त एक अभिनेता नाही तर त्यासोबतच तो अनेक ब्रॅंडच्या जाहिराती करतो, त्याचे ब्रॅंड व्हेन्चर्स आहेत तर त्यासोबत त्याचे काही इतर बिझनेस देखील आहेत. 


देशातील टॉप 5 सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाले तर दुसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय आहे. फॉर्च्युन इंडियानं दिलेल्या टॅक्सपेयर्स यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थलपती विजयनं फायनॅशियल ईयर 2023-24 दरम्यान, 80 कोटी रुपयांचं टॅक्स भरला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुपरस्टार सलमान खान आहे. असं म्हटलं जातं की सलमान खाननं या वर्षी 75 कोटी रुपये टॅक्स पे केले आहेत.


अमिताभ बच्चन ते हृतिक रोशन कोणी किती कर भरला?


या यादीत अमिताभ यांचं देखील नावं आहे. बिग बींनी सगळ्यात आधी टॅक्स भरमारे कलाकार आहेत. तर ते चौथ्या क्रमांकावर आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी एका फायनॅशियन ईयरमध्ये 71 कोटी रुपये टॅक्स पे केलं होतं. तर पाचव्या क्रमांकावर क्रिकेटपटू विराट कोहली आहे. त्यानं 66 कोटी टॅक्स 2024 मध्ये दिलं आहे. या लिस्टमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. जास्त टॅक्स भरणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये पाचव्या क्रमांकावर अजय देवगण आहे. तर असं म्हटलं जातं की त्यानं 42 कोटी टॅक्स भरला आहे. महेंद्र सिंग धोनीनं 38 कोटी आयकर भरला आहे. तर त्याच्या पाठोपाठ रणबीर कपूरचं देखील यात नाव आहे. त्यानं 36 कोटी टॅक्स भरल्याचे म्हटले जाते. हृतिक रोशन आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी 28 कोटी आयकर भरला आहे. 


हेही वाचा : अमिताभ यांची गडगंज संपत्ती कोणाच्या वाट्याला? 13 वर्षांपूर्वीच बिग बींनी केला होता खुलासा


याशिवाय आणखी काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी सगळ्यात ज्यात आयकर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या टॉप 20 च्या यादीत कपिल शर्मानं 26 कोटी आयकर भरला. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी 23 कोटी आयकर भरला. करीना कपूरनं 20 कोटी आयकर भरला आहे तर शाहिद कपूरनं 14 कोटी आयकर भरला आहे. यात हार्दिक पांड्याचं देखील नाव आहे. त्यानं 13 कोटी आयकर भरला आहे त्याच्या पाठोपाठ कियारा अडवाणी आहे तिनं 12 कोटी आयकर भरला आहे. दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल आणि अल्लू अर्जुन या दोघांनी 14 कोटी आयकर भरला आहे. तर पंकज त्रिपाठी आणि कतरिना कैफनं 11 कोटी टॅक्स भरला आहे.