`टवाळखोर`, जेव्हा शाहरुखनं आमिरवर साधला होता निशाणा; `त्या` व्हिडीओमुळे SRK ट्रोल
Shah Rukh Khan Troll : शाहरुख खानचा तो व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Shah Rukh Khan Troll : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान हे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्या दोघांना अभिनय क्षेत्रात खूप ओळख आहे. नुकत्याच झालेल्या अंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, आमिर आणि सलमान या तिघांनी मिळून डान्स केला होता. या व्हिडीओत त्या तिघांमध्ये किती चांगलं बॉन्ड आहे हे दिसून आलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक काळ होता जेव्हा शाहरुख आणि आमिर खान यांच्यात मतभेद होते. शाहरुख आणि आमिर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत शाहरुखला आमिरच्या चित्रपटांविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत शाहरुखनं 'छिछोरापन' सारखे शब्द वापरतात. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि शाहरुखची खूप ट्रोलिंग होत आहे.
हा व्हिडीओ तेव्हाचा आहे शाहरुख खानला त्याचा 'माय नेम इस खान' ला प्रमोट करत आहेत आणि दुसरीकडे आमिर खान हा 'थ्री इडियट्स' हा चित्रपट प्रमोट करत आहे. आमिर खाननं चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी एक नवी आयडीया काढली होती. तो वेश बदलून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत लोकांना भेटायचा आणि चित्रपटाचं प्रमोशन करायचा. त्यावेळी या आयड्यावर शाहरुखला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानं सांगितलं होतं की हा शब्द वापरण्यासाठी माफी मागतो पण ही एक प्रकारचं टवाळखोर वाटतं. मला वाटतं नाही की आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपण या थराला जायला हवं. प्रत्येक चित्रपटाचं मार्केटिंग करण्याची एक पद्धत असते आणि या चित्रपटाची एक वेगळी स्ट्रॅटर्जी असेल.
शाहरुखच्या या कमेंटवर आमिर खाननं उत्तर दिलं होतं. त्याला एका मुलाखतीत शाहरुख खानची ही मुलाखत ऐकवण्यात आली होती आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा आमिर खाननं उत्तर दिलं होतं की जिथे टवाळगिरीचा प्रश्न येतो, त्याला याविषयी जास्त माहित आहे कारण तो स्वत: चं त्याच्या आयुष्यात खूप टवाळगिरी करतो. या सगळ्यात तो खूप जास्त हुशार आहे.
शाहरुख आणि आमिरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून शाहरुखला ट्रोल करण्यात येत आहे. एक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, 'मला वाटतं शाहरुख थोडं जास्त बोलतो... सर्वसामान्य रहाना बाबा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शाहरुखमध्ये किती विष आहे, कोण कोणासाठी इतके वाईट शब्द प्रयोग कसे करु शकतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'शाहरुख खान किती जळतो ते दिसून येतो.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'शाहरुख खानला खूप जास्त गर्व आहे, जो यशराजमुळे त्याला मिळाला आहे. तो सगळीकडे स्वत: ला मोठं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो.'