Shah Rukh Khan Jawan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या पठाण या चित्रपटाचा रेकॉर्ड देखील हा चित्रपट मोडेल असे म्हटले जाते. या चित्रपटातील फक्त शाहरुखचा डबल रोल, अनेक भूमिका, अॅक्शन नाही तर त्यासोबतच त्याचे डायलॉग्स देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यापैकी सगळ्यात चांगला आणि चर्चेत असलेला डायलॉग म्हणजे 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.' आता या डायलॉगविषयी 'जवान' चे लेखक सुमित अरोरा यांनी खूप मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेखक सुमित अरोरानं शाहरुखच्या 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.' डायलॉगविषयी एक मजेशीर खुलासा केला आहे. त्याविषयी बोलताना सुमित म्हणाला की मी त्यावेळी सेटवर होतो, त्यामुळे मला बोलावण्यात आलं आणि मला विचारलं... त्यावेळी त्या सिच्युएशनला पाहून माझ्या तोंडातून जो डायलॉग निघाला की 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.' त्यावेळी असं वाटलं की ही त्या सिच्युएशसाठी असलेली योग्य ओळ किंवा डायलॉग आहे. एटली आणि शाहरुख सर दोघांना हा डायलॉग आवडला आणि सीन शूट करण्यात आला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे याविषयी सांगत सुमित म्हणाला की ही पटकथा तुम्हाला चित्रपट निर्मितीची जादू दाखवून देईल. हा डायलॉग ड्राफ्टमध्ये आधी नव्हताच. शाहरुख सरांनी चित्रपटात जी भूमिका साकारली आहे, त्याला पाहून असं म्हणता येईल की ही लाईन त्यासाठीच होती. कोणत्याही डायलॉग शिवाय तो क्षण मोठा दिसला असता. पण शूटिंग दरम्यान, जाणवलं की त्यात डायलॉग असायला हवा की या व्यक्तीनं (शाहरुख खाननं) काही बोलायला हवं.


हेही वाचा : गोविंदा अडचणीत, 1000 कोटींच्या पोंझी घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी


सुमित पुढे म्हणाला की 'शाहरुख सरांनी ज्या प्रकारे हा डायलॉग डिलीवर केला आहे, त्यानं आमच्या अंगावर शहारे आले. कधी विचार केला नव्हता की हा डायलॉग इतका मोठा होईल. एक लेखक फक्त डायलॉग लिहू शकतो, पण तो हिट होणार की नाही, हे कोणी सांगू शकत नाही.'