गोविंदा अडचणीत, 1000 कोटींच्या पोंझी घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी

Govinda : गोविंदाची या प्रकरणी लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर नक्की हे प्रकरण काय हे कळल्यास आणि त्याच्या समावेश नसल्यास त्याला साक्षीदार बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. 

Updated: Sep 14, 2023, 04:23 PM IST
गोविंदा अडचणीत, 1000 कोटींच्या पोंझी घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी title=
(Photo Credit : Social Media)

Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची ओडिशा आर्थिक अपराध शाखा (EOW) लवकरच चौकशी करणार आहेत. गोविंदानं 1 हजार कोटींचा पोंजी स्कॅम करण्या प्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात गोविंदा ना आरोपी आहे नाही त्याच्यावर संशय आहे. त्याची चौकशी करण्यासाठी लवकरत ईओडब्ल्यूचे अधिकारी मुंबईत येणार आहेत. गोविंदाची चौकशी करण्याचं कारण म्हणजे गोविंदानं कथित रुपात कंपनीचं प्रमोशन केलं होतं. 

या घोटाळ्यामध्ये दोन लाखांहून अधिकजण गोवले गेले होते. जिथं कोणत्याही अधिकाऱाशिवाय कंपनीनं आरबीआयकडून अनामत रक्कम घेतली होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संपूर्ण भारतात 2 लाखांहून अधिक नागरिकांकडून 1000 कोटी रुपये लाटण्यात आले होते. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी गोविंदाची चौकशी करण्यात येणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

EOW चे अधिकारी जनरल जेएन पंकज यांनी TOI ला माहिती दिली की, 'आम्ही लवकरच चित्रपट अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यासाठी मुंबईत एक टीम पाठवणार आहोत. त्यांनी जुलै महिन्यात गोव्यात एसटीएच्या भव्य समारंभात भाग घेतला होता आणि काही व्हिडीओमध्ये कंपनीचं प्रमोशन केलं होतं.' 

त्यांनी पुढे सांगितलं की 'सध्या, अभिनेता ना संशयी आहे आणि नाही ही आरोपी. तपास केल्यानंतर या प्रकरणात त्याची भूमिका काय होती ते समोर येईल. जर आम्हाला कळलं की तो फक्त सोलर टेकनो अलायंस (STA-Token) या ब्रॅंडचं प्रमोशन करत होता, त्यापेक्षा जास्त त्याचा काही त्यात सहभाग नाही, तर आम्ही त्याच्या आमच्या बाजूनं साक्षीदार बनवू.'

हेही वाचा : पहिल्यांदाच खासदार होताच शरद पवार लेकीला म्हणाले...; प्रत्येक वडिलांनी लेकीला द्यावी अशी लाखामोलाची शिकवण

दरम्यान, भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमध्ये येथे हा घोटाळा सुरु होता. तेथे 10 हजार लोक त्याचे बळी झाले. याशिवाय कंपनीने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड, आसाम आणि मध्य प्रदेशातील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये गोळा केले. पण याबाबत जाणून घेण्यासाठी ईटाईम्सनं गोविंदाशी संपर्क साधला असता, कोणतेही उत्तर मिळाले नाही. 7 ऑगस्ट 2023 रोजी, ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेने कंपनी मालक आणि घटनेतील मुख्य आरोपी गुरतेज सिद्धू आणि त्याचा सहकारी नीरोद दास यांना अटक केली होती. भुवनेश्वरस्थित गुंतवणूक सल्लागार रत्नाकर पलाई यांना 16 ऑगस्ट रोजी सिद्धूशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.