Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानमध्ये सगळ्यांची मने जिंकण्याची एक स्किल आहे. त्याचा जवान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून प्रेक्षकांना शाहरुखचे डबल रोल पाहायला मिळाले. त्यातही वेगवेगळ्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं काल यशराज स्टूडियोमध्ये जवानची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टनं हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख खानपासून इतर सेलिब्रिटी देखील मस्ती करताना दिसले. इतकंच नाही तर त्यांनी चित्रपटातील अनेक किस्से देखील सांगितले. या सगळ्यात शाहरुख आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपति यांचा ब्रोमान्स पाहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सेतुपतिला या प्रेस कॉन्फरन्समध्ये चित्रपटाला मिळालेल्या यशावर कशी प्रतिक्रिया आहे याविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत विजय म्हणाला, 'मला विचारू नका. सरांनी खूप यश पाहिलं आहे. सगळ्यात आधी तर मी इतक्या प्रेमाची अपेक्षा केली नव्हती. चेन्नईत असताना काही लोकांनी मला फोन केला आणि म्हटले की त्यांना फस्ट डे फस्ट शोची तिकिट मिळत नाही आहेत. प्रेक्षक शाहरुखवर खूप प्रेम करतात. शाहरुखचं फक्त नाव खूप आहे, जसे ते वागतात, लोकांना भेटतात, ते सगळ्यांना फक्त प्रेम करतात. जर कोणी कुठे शाहरुख खान लिहिलं तर तुम्ही त्याला देखील मिठी मारू शकता. शाहरुख खान नाव खूप आहे. आय लव्ह यू.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजय सेतुपतिनं केलेली स्तुती ऐकल्यानंतर हसत-हसत शाहरुख खान म्हणाला, 'आय लव्ह यू टू सर, आय लव्ह यू ऑल... मला असं वाटतं की प्रेस कॉन्फरंसनंतर मी तुला प्रपोज करू शकतो. आता आपण लग्न करू शकतो. आपण एकत्र अभिनय करू.' यावर विजय बोलतो, 'यात काहीच चुकीचं नाही सर.' यावेळी विजय सेतुपति शाहरुखशी संबंधित एक किस्सा सांगताना दिसतो. 


हेही वाचा : चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे घुसले तरी, कोणीच मदत केली नाही; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर शाहरुखसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.