Shah Rukh Khan's Bald look Jawan :  'जवान' या चित्रपटाची प्रतिक्षा करत असणाऱ्या या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांना चित्रपटाचा टीझर नाही तर चक्क प्रीव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुख खानच्या या प्रीव्ह्यूनं त्याच्या चाहत्यांना मिळालेली मोठी भेट आहे. खरंतर निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या या प्रीव्ह्यूमध्ये शाहरुखचा आश्चर्य चकीत करणारा एक लूक पाहायला मिळाला आहे. शाहरुखचा फक्त एक नाही तर वेगवेगळे लूक पाहायला मिळाले आहेत. शाहरुख यावेळी त्याच्या ठरलेल्या आणि क्लासी हेअर स्टाइलमध्ये नाही तर Bald झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. शाहरुखचा हा लूक पाहता प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट सुपरहीट होईल असे देखील म्हटले आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले नेटकरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवानची जेव्हा घोषणा करण्यात आली होती तेव्हा त्यात शाहरुख एका स्टेशनवर बसल्याचे दिसत होते. पण आता जवानचा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानचा लूक समोर आला आहे. शाहरुख खान या चित्रपटात Bald आहे. शाहरुखच्या या लूकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "डेन्जरस दिसत आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "मी कधी विचार केला नव्हता की Bald लूकमध्ये कोणी इतकं चांगलं दिसेल." 



एक नेटकरी म्हणाला, "किंग खानचं हा Bald लूक इतक्या चांगल्या प्रकारे कॅरी करू शकतो."  आणखी दुसरा नेटकरी म्हणाला, "शाहरुख शिवाय एकतरी हीरो आहे का जो Bald लूकमध्ये इतका डॅशिंग दिसतो." 



एक नेटकरी म्हणाला, "शाहरुख वेगवगेळ्या लूकमध्ये जबरदस्त दिसतोय त्यात त्याचा हा Bald लूक देखील आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "पहिल्या दिवसापासून बोलते जवान हा पठाण पेक्षा यशस्वी ठरणार, पण यावेळी अॅटली हा भारतीय सिनेमाचा एक वेगळा बार सेट करणार आहे. जेव्हा मी व्हिलन होतो ना तेव्हा माझ्यासमोर कोणताच हीरो टीकत नाही." तिसरा नेटकरी म्हणाला, "शाहरुख खानचा हा Bald लूक पाहून मी अजूनही शॉकमध्ये आहे." 



हेही वाचा : घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!


काही नेटकऱ्यांना शाहरुखचा हा लूक आवडलेला नाही. त्या पैकी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त सुंदर केस हे शाहरुखचे होते आणि त्याला Bald पाहणं थोडं विचित्र असेल." 




'जवान' या चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. तर शाहरुखसोबत या चित्रपटात नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपति महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्या देखील भूमिका असून दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांच्या पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.