Shah Rukh Khan fan club : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची प्रतिक्षा प्रेक्षक करत आहेत. 7 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी आगाऊ बूकिंग ही सुरु झाली आहे. त्यात आता सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे की नागपुरमध्ये शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी जवान पाहण्यासाठी पूर्ण थिएटर बूक केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही मुली थिएटरमध्ये जाऊन संपूर्ण ऑडिटोरियम बूक केल्याचे पाहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ 'द क्लब SRK नागपुर' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'जवान' वर आधारीत आहे. शाहरुखच्या जवानची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ ही पाहण्याजोगी आहे. हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखच्या या फॅन क्लबनं लिहिलं की जवानची तिकिट बूक झाली आहेत. आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही जवानला वुमेन सेंट्रिक अंदाजात संपूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. आमच्या मुली त्यांच्या चीफच्या ऑगर्डर्स फॉलो करत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी पुढे शाहरुख खान, पूजा ददलानी आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटला टॅग केलं आहे. 



व्हिडीओत काही मुली उभ्या असून एका मुलीच्या हातात सूटकेस आहे. हेच सुटकेस घेऊन त्या सिनेपोलिस मल्टीप्लेक्सच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. या व्हिडीओत पुढे गार्ड आणि बुकिंग काऊंटरवर एका मुलीला सगळे नमस्कार करतात आणि त्यानंतर विचारताना दिसतात की तुम्हाला कोणता शो बूक करायचा आहे. तर बूकिंग करण्यासाठी आलेली मुलगी बोलते की जवानसाठी संपूर्ण ऑडिटोरियम बूक करायचं आहे. 


हेही वाचा : '...म्हणून करीनाची 'कहो न प्यार है'मधून झाली हकालपट्टी'; अमीषा पटेलचा गौप्यस्फोट


या व्हिडीओत शाहरुखच्या फॅन क्लबनं संपूर्ण ऑडिटोरियम बूक केल्याचे दिसत आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये बोलायचे झाले तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळे वेडे झाले आहे. अनेकांना या गोष्टीवर आश्चर्य होत नाही आहे. अनेकांनी त्या मुलीची स्तुती केली आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत महत्त्वाच्या भूमिकेत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.