Jawan took over Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' या चित्रपटानं काल हिंदी चित्रपटसृष्टीत नवा रेकॉर्ड केला होता. 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यानं शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाला देखील मागे टाकले होते. मात्र, आता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं 'गदर 2' चा हा रेकॉर्ड मोडला आहे. 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'जवान' हा रेकॉर्ड केल्याची माहिती रेड चिलीजनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग खानच्या 'जवान' या चित्रपटानं संपूर्ण भारतात 584.32 कोटींची कमाई केली. तर पठाणनं भारतीय बॉक्स ऑफिसवर 524.53 कोटींची कमाई केली होती. तर सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटानं 524.75 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे 'गदर 2' हा चित्रपटात आता भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'गदर 2' हा चित्रपट फक्त 24 तासासाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिल्या स्थानी होता. सनी देओलकडे असलेलं हे स्थान पुन्हा एकदा किंग खानकडे गेलं आहे. 



'गदर 2' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट गेल्या महिन्यात 11 तारखेला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. तर प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तर शाहरुख खानचा जवान याच महिन्यात 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. एका महिन्याच्या आत या चित्रपटाच्या तिकिटांवर ऑफर मिळू लागल्या आहेत. ती ऑफर अशी आहे की एक तिकिट खरेदी केल्यानंतर तुम्हाला दुसरं तिकिट देखील फ्री मिळेल. त्यामुळे जवानच्या कमाईचा आकडा कमी होत असताना ही ऑफर मिळताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विकेंड पाहता जवानच्या कमाईत चांगलीच वाढ होऊ शकते. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे. 


हेही वाचा : चाहत्यासाठी इतकं कोण करतं? Fan च्या निधनाची बातमी मिळताच सूर्याने जे केलं ते पाहून डोळे पाणावतील


शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. पठाण आणि जवान प्रदर्शित झाल्यानंतर आता यंदाच्या वर्षी शाहरुखचा 'डंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'डंकी' हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू दिसणार आहे.