Shah Rukh Khan Jawan New Song : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या जवान या  चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला होता. त्या प्रिव्ह्यून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले होते. प्रिव्ह्यूमध्ये आपल्याला शाहरुखचा डबल रोल आहे हे कळलं होतं. त्यानंतर चित्रपटातील विजय सेतुपतिचा लूक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. विजय शिवाय या चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणि यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, नुकतचं चित्रपटाचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत होतं. त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे या गाण्याचं निर्मात्यांनी तब्बल 15 कोटी रुपये खर्च केले होते. आता अखेर हे गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. त्या गाण्याचं नावं 'जिंदा बंदा' असं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखच्या या आगामी चित्रपटाचं आज सोमवारी पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव जिंदा बंदा असं आहे. या चित्रपटाचं तमिळमध्ये वंधा एडम आणि तेलगूमध्ये धुम्मे धुलिपेला असे आहे. शाहरुखनं गाणं प्रदर्शित होण्याआधी एक पोस्टर शेअर केलं होतं. दरम्यान, शाहरुखच्या जवान या चित्रपटातील जिंदा बंदा हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून ट्विटरवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला शब्दबद्ध इरशाद कामिल यांनी केले आहे.  तर अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला दोन तासात 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाला आहे. 



हेही वाचा : आलियाचा चित्रपट पाहिल्यानंतर रडू लागला अनुराग कश्यप; करण जोहरची स्तुती करत म्हणाला, 'मी दोन वेळा...'



मीडिया रिपोपर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या 'जिंदा बंदा' या गाण्यासाठी 15 कोटींचा खर्च करण्यात आला होता. मिड डेनं दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अॅटलीनं या गाण्याला इतकं ग्रॅंड बनवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. या गाण्याचं शूटिंग हे चेन्नईत पाच दिवस सुरु होते. गाण्यात तब्बल 1 हजार डान्सर्स आहेत. जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अॅटलीनं काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करत शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. जवान हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिल आणि तेलगु भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय सेतुपतीनं फ्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला फक्त विजयसोबत काम करायचे होते.