मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात. शिवाय शाहरुखच्या बंगल्याबाहेर 'मन्नत' म्हणून नावाची पाटी लागली आहे. त्या नावाच्या पाटी समोर उभे राहून देखील चाहते फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण ज्या 'मन्नत'बाहेर चाहते फोटो काढयचे त्या नावामध्ये मोठा बदल झालेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखच्या 'मन्नत'बंगल्यात झालेला बदल सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची पाटी बदलली आहे. त्या बदलाचा फोटो शाहरुखच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



ब्रिजवा एसआरके फॅन या ट्विटर अकाउंटवरून 'मन्नत' बंगल्याच्या पाटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'घराच्या नावाची पाटी बदलणे हा राष्ट्रीय विषय बनला आहे @iamsrk #Mannat ' सध्या हा ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



फोटो व्हायरल होताचं अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. एवढंच नाही तर शाहरुखचा बंगला 'मन्नत'च्या आधीच्या पाट्या देखील समोर आल्या आहेत. युजर्स 'मन्नत'ची आधी असलेली पाटी... आणि आता असलेली नावाची पाटी... अशा प्रकारे नावाच्या पाट्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.