Jab We Met 2: 2007 साली आलेला जब वी मेट हा सिनेमा तरूणाईनं अक्षरक्ष: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाची तेव्हा जोरात चर्चा रंगलेली होती. या चित्रपटातील गाणीही तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यातून करीना आणि शाहिद कपूरच्या केमेस्ट्रीलाही प्रेक्षकांनी तूफान दाद दिला होता. त्यानंतर त्या दोघांच्याही अफेअर्सची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मीरा राजपूतशी शाहीद कपूर हा विवाहबंध आहे त्यांना दोन मुलंही आहेत. तर करीनानं 2012 साली सैफ अली खानशी लग्न केले. आता त्यांनाही तैमूर अली खान आणि जेह अली खान ही दोन गोंडस मुलं आहेत. आता तब्बल 17 वर्षांनी म्हणजेच जब वी मेटनंतर ते दोघंही याचं चित्रपटाच्या पुढच्या सिक्वेलसाठी एकत्र येणार आहेत. 


अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे जब वी मेट 2 ची. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यावेळी शाहीद आणि करीना एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट लवकरच आकार घेईल अशी जोरात चर्चा आहे. या रिपोर्टनुसार, अष्टविनायकचे मालक या चित्रपटाची निर्माती करणार आहेत. गंधार फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत ते या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे कळते आहे. यावेळी असेही कळते आहे की इमतियाज अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या दुसऱ्या चित्रपटाचेही ते दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जाते आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाबद्दल कुठलीच अधिकृत माहिती आलेली नाही. 


हेही वाचा : भाऊ कदमच्या आवाजात विद्या बालनची तूफान कॉमेडी; 'ऐका हो ऐका' VIDEO पाहिलात का?


यंदा या चित्रपटातून परत करीना आणि शाहिद एकत्र दिसतील अशी फक्त चर्चा आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत शाहिद कपूर म्हणाला होती की, ''हा चित्रपट येईल का हे संहितेवर आधारित आहे. जर त्या संहितेची अशी गरज आहे की या चित्रपटाचा सिक्वेल येयला हवा तर नंतर अरे, पहिल्यास चित्रपटापेक्षा हे चांगलं असेल का, त्याच्याशी जुळेल का तर मी तो करेन. आणि जर मला असं वाटतं नसेल तर मी नाही. परंतु त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वापरण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्ही ते का वापरत आहात असं मी म्हणेन.'', असं तो म्हणाला होता.