मुंबई: 'कबीर सिंग'च्या उध्वस्त प्रेम कथेनंतर अभिनेता शाहीद कपूरच्या करियरला चांगलीच कलाटनी मिळाली आहे. रील लाईफमध्ये उध्वस्त झालेला हा कबीर रियल लाईफमध्ये मात्र प्रगती पथावर आहे. तो लवकरच त्याच्या नव्या घरात राहायला जाणार आहे. अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मीरा कपूर यांना दोन मुलं आहेत. कुटुंब वाढल्यामुळे त्याने वरळी येथे सी-फेसिंग डुप्लेक्स  घर खरेदी केला आहे. लवकर त्याला घराचा ताबा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, शाहीदचे हे घर ८ हजार स्क्वेअर फिटचे आहे. तर घरामध्ये बाल्कनी असावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे ५०० स्क्वेअर फिटच्या जागेत एक आकर्षक बाल्कनी साकारण्यात येणार आहे. शाहीदच्या या नव्या घरात स्पा, जिम, बॉलरूम, स्विमिंगपूल यांसारख्या सुविधा असणार आहे. 


शिवाय, रणवीर-दीपिका आणि विराट-अनुष्‍का त्यांचे नवीन शेजारी असणार आहेत. आमची सहयोगी वेबसाइट डीएनएसोबत संवाद साधताना शाहीद म्हणाला की, 'मी मुंबई सेंट्रलमध्ये घर खरेदी केलं आहे. दोन मुलांसह आमचं कुटुंब वाढत आहे. त्यामुळे मला मोठ्या घराची गरज आहे.' मुलांच्या भविष्यासाठी शाहीदने नवे घर खरेदी केले आहे.