मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. मीरा राजपूत पुन्हा एकदा आई होणार आहे. ही गुड न्यूज खुद्द शाहिदनेच सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली. 
रविवारीच शाहिद आणि मीराच्या मुलीचा मीशा कपूरचा दुसरा वाढदिवस होता. या पार्टीची थीम फ्रुट होती. मीशाचा बर्थडे केकही फळांनी सजलेला होता. पार्टीचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये शाहीदची आई, वडील पंकज कपूर, दिग्दर्शक अभिषेक कपूर, ईशान खट्टर सहभागी झाले होते. पार्टीत मिशाने व्हाईट फ्रॉक परिधान केला होता. त्यात मिशा अत्यंत क्यूट दिसत होती.


तुम्हीही पाहा मिशाच्या बर्थडे पार्टीचे हे फोटोज...





यावेळेस शाहिद आणि मीरा मात्र अगदी सिंपल ड्रेसमध्ये दिसले. बर्थडे केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.