मुंबई : अभिनेते शाहिद कपूरने त्याच्या युरोप बायकिंग ट्रिप दरम्यान एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद व्यतिरिक्त कुणाल खेमू आणि ईशान खट्टर फोटो क्लिक करण्यासाठी विचित्र पोज देताना दिसत आहेत. शाहिद कपूरने त्याच्या युरोप बाइकिंग ट्रिपचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये, शाहिद, त्याचा भाऊ इशान खट्टर आणि कुणाल खेमू एक फोटो क्लिक करण्यासाठी परिश्रम करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शाहिद, कुणाल आणि ईशान फोटोसाठी दोन भिंतींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
 



फोटोसाठी हा स्टंट करणं कुणालला मात्र जमलं नाही. गल्ली होणारा गोंधळ ऐकून जवळच्या घरातील एक महिला तिची खिडकी उघडते आणि डोकावू लागते, त्यानंतर शाहिद पोज सोडून सरळ उभा राहतो.


शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा मजेदार व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये  'Sorry Aunty' असं लिहिलं आहे.  सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.