Shahid Kapoor At Manish Malhotra Diwali Party: लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं काल 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. नेहमी प्रमाणे यंद्याच्यावेळी देखील पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे यावेळी दिसले. प्रत्येक सेलिब्रिटी यावेळी हटके स्टाईलमध्ये दिसले. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरनं वेधलं आहे. त्यानं परिधान केलेल्या ड्रेसनं सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. अनेकांनी तर असं देखील म्हटलं की त्यानं पत्नी मीरा राजपुतचा अनारकली ड्रेस परिधाक केला की काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आणि मीराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनं मॅचिंग आउटफिटमध्ये दिसत आहे. दोघांनी शिमरी ड्रेस परिधान केला आहे. मीरानं व्हाइट आणि गोल्डन रंगाचं सीक्वेंस साडी नेसली आहे तर शाहिदनं चिकनकारी असलेला अनारकलीसारखा ड्रेस परिधान केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शाहिज कपूरचा ड्रेस पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं की यानं मीराचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बाजीराव मस्तानीच्या शूटिंगच्या वेळी मस्तानीनं परिधान केलेला ड्रेस शाहिदनं काही काळासाठी घेतला आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'रणवीर सिंगवरून शाहिद इन्स्पायर झाला आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'या दोन्ही बहिणी कुठे जात आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शाहिद कपूरनं जो ड्रेस परिधान केला आहे तसा ड्रेस माझ्याकडे देखील आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'घरात असं काही घालून पाहणं ठीक आहे, पण बाहेर घालून आला नशेत आहे वाटतं.' 


दरम्यान, मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, रेखा, आलिया भट्ट, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, श्रद्धा कपूर, तृप्ती डिमरी, तमन्ना भाटिया, आदित्य रॉय कपूर, विजय वर्मा, सिद्धांत चतुर्वेदी, फातिमा सना शेख, हुमा कुरेशी, गौरी खान ते अशा अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.