मुंबई : कॉफी विथ करण हा असाच एक चॅट शो आहे जो लोकांना प्रचंड आवडतो. जिथे अनेक मनोरंजक आणि मसालेदार गप्पाटप्पा समोर येतात. करण जोहरच्या या चॅट शोच्या ताज्या सीझनमध्ये अनेक स्टार्सही आले होते. असाच एक एपिसोड होता ज्यामध्ये शाहिद त्याची 'कबीर सिंग' को-स्टार कियारा अडवाणीसोबत आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एपिसोडमध्ये बर्‍याच मजेदार गोष्टी घडल्या आणि अनेक गडद रहस्यही उघड झाली. एपिसोडमध्ये शाहिदने त्याच्या शरीराच्या एका भागाबद्दल असं अश्लील वक्तव्य केलं की,  कियारा आणि करण लाजेने तोंड लपवू लागले.


'कॉफी विथ करण'मध्ये शाहिद कपूर काय म्हणाला होता?
कॉफी विथ करणच्या प्रत्येक एपिसोडमध्ये, करण जोहर त्याच्या पाहुण्यांना त्यांचं खाजगी आणि वैयक्तिक आयुष्यातील रहस्ये सांगायला लावतो. शाहिद आणि कियाराच्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं होतं. करणच्या एका वैयक्तिक प्रश्नावर शाहिदची जीभ घसरली आणि तो असं काही बोलला की, कियारा आणि करण थक्क झाले.


शरीराच्या या भागाबद्दल अतिशय अश्लील गोष्ट बोलून गेला
कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये करणने शाहिदला विचारलं की, त्याच्या मते त्याच्या शरीराचा सर्वात सेक्सी भाग कोणता आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शाहिदला खूप कमी वेळ लागला आणि त्याने लगेच सांगितलं की, त्याच्या शरीराचा सर्वात सेक्सी भाग सध्या कॅमेरामध्ये दिसत नाहीये. शाहिद त्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलतोय हे उघड आहे. त्याचं हे उत्तर ऐकून कियारा आणि करणला धक्का बसला.


Kiara ने कन्फर्म केलं तिचं रिलेशनशिप 
या एपिसोडमध्ये विचारलं असता कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि ते जवळचे मित्र नसून त्यांच्यापेक्षा खूप जास्त असल्याचं कबूल केलं आहे. करण आणि शाहिद त्यांच्या भावी मुलांबद्दल खूप आरामात बोलत होते आणि शाहिदने असंही जाहीर केलं आहे की, या वर्षाच्या अखेरीस कियारा एक मोठी घोषणा करू शकते जी चित्रपटाबद्दल नसेल. करण आणि शाहिदने सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात डोला रे डोला या गाण्यावर डान्स करण्याचा प्लॅन केला होता.