Shahid Kapoor and Mira Rajput: शाहिद कपूर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. शाहिदची बायको मीरा राजपूतचा आज 28 वा वाढदिवस. अशात शाहिदने आपल्या पार्टनरविषयी प्रेम व्यक्त केलं नसतं तरंच नवल. शाहिदने मीरा राजपूतला अत्यंत रोमँटिक पद्धतीने बर्थडे विश केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद कपूर कायमच मीरा राजपूरबाबत आपलं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. असंच काहीसं आजही झालेलं पाहायला मिळालं. शाहिदने मीरासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये एक खास मेसेज देखील लिहिला आहे. 


शाहिद कपूरची पोस्ट 


मीरा राजपूतला 'लवर' म्हणत शाहिदने कॅप्शन लिहिलं आहे. शाहिदने 'हॅपी बर्थडे लवर' असं कॅप्शन लिहिलेलं पाहायला मिळतंय. "हातात हात, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यांमध्ये चमक; आपल्या आयुष्याच्या चढ उतारांमध्ये आपण असेच सोबत डान्स करत राहू", असं शाहिदने लिहिलं आहे. यावर मीरा राजपूतने देखील 'आय लव्ह यू फॉरेव्हर' असा रिप्लाय दिला आहे. 



 


शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं 2015 साली लग्न झालं. मीरा आणि शाहिद यांचं रिलेशन प्रचंड इंटिमेट होतं. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला केवळ कुटुंबातील लोकांनीच हजेरी लावली होती. दिल्ली आणि मुंबईत शाहिद आणि मीराच्या लग्नाचं रिसेप्शन झालेलं. या रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील सेलेब्स देखील आलेले पाहायला मिळाले होते.