मुंबई : शाहरुख खानला बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हटलं जाते. त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. मात्र, त्याची काजोलसोबतची जोडी सर्वाधिक हिट ठरली. दोघांनी बाजीगरपासून डीडीएलजे आणि दिलवालेपर्यंत एकत्र काम केलं. प्रत्येक वेळी दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे दोघांची केमिस्ट्री पडद्यावर हिट होत असताना दुसरीकडे दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. एककाळ असा होता की, शाहरुखला काजोल आवडत नव्हती आणि एकेकाळी त्याने आमिर खानला तिच्यासोबत काम न करण्याचा सल्लाही दिला होता.


या चित्रपटाशी संबंधित जोडला गेलाय किस्सा
वास्तविक, 1993 मध्ये आलेल्या 'बाजीगर' चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख खान आणि काजोलची जोडी पडद्यावर दिसली होती. ज्याला लोकांनी खूप प्रेम दिले होतं. मात्र, चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना शाहरुखला काजोल अजिबात आवडली नाही. याचा उल्लेख खुद्द शाहरुखने एका मुलाखतीदरम्यान केला होता.


त्याने सांगितलं की, जेव्हा आम्ही दोघं एकत्र काम करत होतो तेव्हा मला ती आवडत नव्हती, मला वाटायचं की ती तिच्या कामावर लक्ष देत नाही.


आमिरला एकत्र काम न करण्याचा सल्ला दिला होता
दरम्यान, एकदा आमिर खानने त्याला विचारलं की, मला काजोलसोबत काम करायचं आहे, ती कशी आहे? त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देत शाहरुखने तिच्यासोबत काम न करण्याचा सल्ला दिला. शाहरुख म्हणाला  की, तू तिच्यासोबत काम करू नकोस, कारण ती बरोबर नाही, कामासाठी सेटवर तिचं अजिबात लक्ष नसतं.


मात्र, जेव्हा 'बाजीगर' पडद्यावर प्रदर्शित झाला, तेव्हा शाहरुख खानही काजोलचा चाहता झाला आणि मग त्याने आमीर खानला फोन करून सांगितलं की, मी चुकीचं बोलत आहे, ती काहीतरी वेगळी आहे, तिच्यात जादू आहे.  तिने तिचं अभिनय कौशल्य पडद्यावर पसरवलं आहे. मात्र, 2006 मध्ये आमिर आणि काजोल 'फना' चित्रपटात एकत्र दिसले होते.