मुंबई : वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण, बहुप्रतिक्षीत भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. आज रविवारी फादर्स डे आणि भारत-पाकिस्तान सामन्याचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. बॉलिवूड किंग खान शाहरुखही या सामन्यासाठी उत्साहित असल्याचं दिसत आहे. शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन हा सामना पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने सोशल मीडियावर त्याच्या मुलासोबत आर्यनसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख आणि आर्यन दोघांनीही टीम इंडियाची निळ्या रंगाची जर्सी घातलेले दिसत आहेत. शाहरुखच्या जर्सीवर मुफासा आणि आर्यनच्या जर्सीवर सिंबा असं लिहिलेलं आहे. 


शाहरुखने कॅप्शनमध्ये 'फादर्स डेच्या उत्साहासह मॅच पाहण्यासाठी तयार आहे...गो इंडिया गो...' असं लिहिलं आहे. 



शाहरुख आणि आर्यनच्या जर्सीवर लिहिलेलं मुफासा आणि सिंबा म्हणजे प्रसिद्ध कार्टुन चित्रपट 'लायन किंग'मधील पात्र आहेत. 


विश्वचषकातील सर्वात महत्त्वपूर्ण भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.