Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...
Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे.
Shahrukh Khan Fight With Ranbir Kapoor : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. इतकंच काय तर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली होती. पठाणनं आता पर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान, या सगळ्यात शाहरुख आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर शाहरुखची खिल्ली उडवताना दिसत आहे.
शाहरुख आणि रणबीरचा हा व्हिडीओ फिल्मफेअर अवॉर्डचा आहे. या व्हिडीओत शाहरुख बोलतो की, 'रणबीर, गेल्या दोन वर्षात इमरानसोबत केलेलं तुझं सुत्रसंचालन पाहिलं आणि तू चांगंल काम केलंस. यावर रणबीर शाहरुखचे आभार मानतो, ज्यावर शाहरुख पुढे बोलतो, मला वाटलं की स्टेजवर तू थोडी ओव्हर अॅक्टिंग करतोस, तर यंदाच्या वर्षी एक विनंती आहे की कृपया ओव्हर अॅक्टिंग करू नकोस.'
रणबीर शाहरुखला उत्तर देत बोलतो, जर मी ओव्हरअॅक्टिंग केली तर त्याला फिल्मफेअरला त्याचे नाव बदलून डॉन 2 असे नाव द्यावे लागेल. यावर शाहरुख त्याच्या शैलीत उत्तर देत बोलतो, "संभाल के हीरो... संभाल के, जितनी तेरी गर्लफ्रेंड नहीं हुई ना बचपन से..., उससे ज्यादा फिल्मफेअर अवॉर्ड्स मेरे पास है" शाहरुखचं हे उत्तर ऐकूण तेथे उपस्थित असलेले लोक हैराण होतात.
'पठाण'ने गाठला 300 कोटींचा टप्पा
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, भारतात पठाणने 34 ते 36 कोटींची कमाई केली आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने ही कमाई फार काही मोठी नाही. पण चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेली कमाई पाहता हा आकडा फार कमी आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाण चित्रपट आमीर खानच्या दंगल, बाहुबली २ आणि केजीएफ२ ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे.
हेही वाचा : Ajay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. यासह पठाणने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. दरम्यान जगभरातील कमाईचा आकडा 106 कोटी होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत पठाणने दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. यासह जगभरातील कमाईचा आकडा 235 कोटींवर पोहोचला. तीन दिवसात पठाणने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शाहरुख खानच्या पठाणने आतापर्यंत 21 नवे रेकॉर्ड केले आहेत. कोविडनंतर पठाण पहिला चित्रपट आहे, ज्याने सलग दोन दिवस इतकी कमाई केली आहे.