`तू माझी पहिली...`, रेणुका शहाणेच्या पोस्टवर उत्तर देत हे काय बोलून गेला Shahrukh Khan
Shahrukh Khan नं केलेल्या या ट्वीटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Shahrukh Khan and Renuka Shahane Worked Together : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपट बॉक्स ऑफिवर बक्कळ कमाई करत आहे. पठाण एकामागे एक कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हा चित्रपट पाहून आले. अजूनही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. शाहरुख हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, नुकती अभिनेत्री रेणूका शहाणेनं (Renuka Shahane) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी पठाण पाहणार असल्याचे म्हटले आहे. यावर शाहरुखनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
रेणूका शहाणे यांनी रविवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रेणूका म्हणाल्या की अखेर पठाण पाहायला जात आहे. 'वातावरण ठीक आहे, सीट बेल्ट लावले आहेत. कर्नल लूथरा यांच्यासोबत चित्रपट पाहत आहे.' रेणूका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांचे पती आणि अभिनेता आशुतोष राणा देखील दिसत आहेत. रेणूका यांच्या या ट्वीटवर उत्तर देत एक पोस्ट केली आहे. "कर्नल लूथरा जी यांना तुम्ही सांगितलं का? की तुम्ही माझ्या पहिल्या हीरोइन होत्या. आपण हे गुपीत ठेवायला पाहिजे नाही तर ते मला एजंसीमधून काढून टाकतील." शाहरुखच्या या मजेशीर ट्वीटवर रेणुका यांनी उत्तर दिले आहे. यावेळी रेणुका म्हणाल्या, "हाहाहा, त्यांच्यापासून कोणती गोष्टी कुठे लपली आहे? तुम्ही त्यांना सर्वज्ञानी म्हटले आहे आणि काही झालं तरी तुम्हाला ते फायर करणार नाही. कारण जे काम तुम्ही करता ते कोणी करू शकणार नाही." दरम्यान, शाहरुख आणि रेणुका यांनी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्कस या मालिकेत एक काम केले होते.
हेही वाचा : Urfi Javed ला पूर्ण कपड्यात पाहून बसेल धक्का, पण आरशात पाहाल तर...
शाहरुखच्या या ट्वीटवर आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले, "वेळ जशी जाते तसे वयही वाढते. तुमचं वय वाढत आहे. चिंता तर लूथराला आहे की तो पुढच्या मिशनच्या वेळई असेल की नाही? कारण शेवटच्या सीनच्या वेळी तुम्ही लूथराला हे बोलायला सांगितले की तलवार पण पठाणची आणि नियमपण पठाणचे. अप्रतिम काम केलं आहे. खूप खूप शुभेच्छा.