१८ व्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने सुहानाला दिला खास मेसेज....
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा २२ मे ला १८ वा वाढदिवस होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा २२ मे ला १८ वा वाढदिवस होता. गौरी खानने मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक छानसा फोटो शेअर केला. तर शाहरुखने वाढदिवस संपतानाच फोटो शेअर करत मुलीसाठी खास छान मेसेज दिला.
पहा काय म्हणतोय शाहरुख...
शाहरुखने शेअर केलेल्या फोटोत सुहाना आकाशात उडताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना शाहरुखने लिहिले की, इतर मुलींप्रमाणे तु देखील उडण्यासाठी बनली आहेस आणि आता अधिकृतपणे तू ते सर्व करु शकतेस जे तू १६ वर्षांची असतापासून करत होतीस. लव यू. गौरी खाननेही मुलीचा फोटो शेअर करत मुलीसाठी मोठ्या पार्टीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
बॉलिवूडमध्ये पर्दापणाच्या तयारीत
सुहाना देखील वडीलांप्रमाणे अभिनयात करिअर करु इच्छित आहे. सुहाना सुंदर असण्याबरोबरच तिचे चेहऱ्यावरील हावभावही जबरदस्त आहेत. लवकरच ती एका मॅगझीनसाठी शूट करणार असल्याची माहिती गौरी खानने दिली.
लोकप्रिय स्टार किड
शाहरुख खानची मुलगी सुहाना स्टार किड्सच्या यादी अत्यंत लोकप्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॉलोअर्स आहेत. तिच्या फॅनपेजवरुन तिचे नवनवे फोटोज समोर येत असतात.