नवी दिल्ली : बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला द यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनने फिलांथ्रोपी विषयात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. स्वत: शाहरुखने याबाबत आपल्या ट्विटरवरून माहिती दिली. शाहरुखला देण्यात आलेली ही पहिली पदवी नाही. याआधीही शाहरुखला २००९ साली यूनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर आणि २०१५ साली यूनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमधूनही मानद पदवीने पुरस्कृत करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने डॉक्टरेट पदवीसह एक फोटो ट्विट करत 'यूनिव्हर्सिटी ऑफ लॉ'चे आभार मानले आहेत. या यूनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना शाहरुखने पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 'ही पदवी आमच्या मीर फाउंडेशनच्या टीमला पुढे निस्वार्थ काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल' असे शाहरुखने म्हटले आहे. शाहरुख खानची एनजीओ 'मीर फाउंडेशन' अॅसिड अॅटक पिडितांसाठी काम करते.



शाहरुख खान 'जीरो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. 'जीरो' चित्रपट बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येणार आहे. फिल्म फेस्टिवलमध्ये यावर्षी दाखवण्यात येणारा हा शेवटचा चित्रपट आहे. बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल १३ ते २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.