मुंबई : दिल्लीतला एक साधारणसा मुलगा आज बॉलिवूडचा बादशाह बनला आहे. ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून सत्य परिस्थिती आहे. हा मुलगा दुसरा तिसार कोणी नाही, तर तो आहे किंग खान अर्थान शाहरुख खान. बॉलीवूडवर राज्य करणारा शाहरुख खान केवळ लोकांच्या मनावर राज्य करत नाही तर नेमहीच चर्चेतही असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या चांदणी चौकातील रस्त्यांपासून मुंबईतल्या मन्नतपर्यंतचा प्रवास शाहरुखसाठी सोपा नव्हता. पण आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सर्वात वरती आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर टॉम क्रूझ, टॉम हँक्स आणि अॅडम सँडलर यांसारख्या हॉलीवूड कलाकारांनीही कमाईच्या बाबतीत त्याने मागे टाकलं आहे. 


यासोबतच तो आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचाही मालक आहे. शाहरुखच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या कमाईची संपूर्ण माहिती जाणून घ्या.


5100 कोटींचा मालक


शाहरुख खानच्या संपूर्ण कारकिर्दीतील एकूण संपत्तीचा आकडा 5100 कोटींवर आहे. एका रिपोर्टनुसार, शाहरुख दर महिन्याला किमान 12 कोटी कमावतो. तर वर्षभरातील त्याची कमाई 240 कोटींहून अधिक आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख प्रत्येक चित्रपटासाठी 40-50 कोटी मानधन घेतो, तर जाहिरातीसाठी तो 22 कोटी रुपये मानधन घेतो.



शाहरुख खानचं घर


शाहरुखचं मुंबईतलं घरं अर्थात 'मन्नत' जगभरात प्रसिद्ध आहे. शाहरुखचे लाखो चाहते त्याच्या घराबाहेर खास फोटो काढण्यासाठी येतात. शाहरुखच्या या घराची किंमत जवळपास 200 कोटी आहे. शाहरुखचंही दिल्लीत घर आहे. याशिवाय शाहरुखने दुबईत एक व्हिलाही खरेदी केला आहे. या व्हिलामध्ये 6 बेडरूम आहेत.



महागड्या गाड्यांचा ताफा


शाहरुख खानच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. शाहरुखकडे Bugatti Veyron, BMW 6 Series, Mitsubishi Pajero, BMW 7 Series Car, Audi A6, Land Cruiser, Rolls Royce Drop Hate Coupe सारख्या लक्झरी गाड्या आहेत.


शाहरुखचे लाखो चाहते


शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शाहरुखचा फॅन फॉलोइंग आणि त्याच्यावरील चाहत्यांचं प्रेम आजही पूर्वीसारखेच अबाधित आहे. त्याच्या वाढदिवसाचा दिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. 


शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर त्याचे चाहते मोठ्या संख्येने जमतात. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास वाट पाहत असतात. शाहरुखही आपल्या चाहत्यांना निराश करत नाही. मन्नतच्या टेरेसवरून चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करताना दिसतो.



'मन्नत'पर्यंतचा प्रवास


शाहरुख खानचं घर 'मन्नत'ची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र, मन्नत बंगल्यापर्यंत पोहचण्याचा शाहरुखचा प्रवासही अत्यंत रोमांचक आहे. 1997 मध्ये शाहरुखाने 'येस बॉस' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पहिल्यांदा हा बंगला पाहिला. बंगला पाहताच शाहरुख या बंगल्याच्या प्रेमात पडला. त्यावेळी हा बंगला गुजराती व्यापारी नरिमन दुबास यांच्या नावावर होता.


त्यावेळी या बंगल्याचं नाव होतं 'व्हिला व्हिएन्ना'. मेहनतीच्या जोरावर शाहरुखने स्वप्नातलं हे घर अखेर आपल्य नावावर केलं. 2001 मध्ये शाहरुख खानने हा बंगला विकत घेतला. त्यानंतर या बंगल्याचं नाव त्याने 'जन्नत' ठेवण्याचा विचार केला होता, पण त्यानंतर त्याने बंगल्याचं नाव 'मन्नत' ठेवलं. शाहरुखने हा बंगला 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता. शाहरुखच्या या बंगल्याची रचना 20 व्या शतकातील ग्रेड-3 हेरिटेजची आहे. आज या बंगल्याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये इतकी असेल.


गौरी खानचं इंटीरियर डिझाइन


सी-फेस असलेला मन्नत बंगला 6 मजल्यांचा आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम इथल्या बँडस्टँड इथं हा बंगला आहे. मन्नतचे इंटीरियर डिझायनिंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे. गौरीने हे घर 1920 च्या दशकानुसार डिझाइन केलं आहे.


टीव्ही मालिकांमधून सुरुवात


शाहरुखने दिल्लीहून मुंबईत येऊन टीव्हीवरील 'सर्कस' आणि 'फौजी' सारख्या मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. बॉलीवूडचा बादशाह असणाऱ्या सुपरस्टार शाहरुख खानची देशातच नाही तर परदेशातही वेगळी ओळख आहे.