मुंबई :बॉलिवूडचा बादशाह असलेला शाहरूख खान लवकरच टीव्ही जगतात पुनरागम करत आहे. बॉलिवडूचा हा किंग खान स्टार प्लसच्या टेड टॉक्स इंडिया : नई सोच ' या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शोमध्ये स्पीकर आपली कहाणी १८ मिनिटांत दर्शकांसमोर सांगणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील प्रेरणादायी कहाणी या शो चा महत्त्वाचा भाग असणार आहे. 


एकता आणि करणची एन्ट्री


 शोमध्ये एकता कपूर आणि करण जोहर आलेले दिसणार आहेत. त्या दोघांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से ऐकायला मिळणार आहेत. 



 या कार्यक्रमाचे एकूण किती भाग होतील हे अद्याप फायनल झाले नाही. पण प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यास याचा सीझन २ देखील आणण्यात येणार आहे.


२० ऑगस्टपासून शूटींग


सुत्रांच्या माहितीनुसार, 'आनंदी राहणे का गरजेचे आहे' या विषयावर गप्पा मारण्यासाठी रजनीकांत यांना आमंत्रित संपर्क करण्यात आले आहे. शाहरूख या शोचा होस्ट असणार आहे. शो मध्ये येणाऱ्या लोकांचा अनुभव आणि यशाची कहाणी तो सांगणार आहे. २० ऑगस्ट पासून शो ची शूटींग सुरु होणार आहे.