Shahrukh Khan's Mother : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहरुख तब्बल 4 वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज शाहरुखकडे सगळं असलं तरी देखील त्याच्या मनात आता एकच खंत आहे. शाहरुख त्याच्या आईच्या शेवटच्या काळात तिला म्हणाला होता की तो मद्याच्या आहारी जाईन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खाननं एका मुलाखतीत स्वत: हा खुलासा केला आहे. त्यानं आईच्या शेवटच्या काळात खूप कठोर शब्दात वक्तव्य केलं होतं. शाहरुख खानने डेव्हिड लेटरमॅनला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा त्याची आई फातिमा लतीफा खानची तब्येत बिघडली होती तेव्हा त्याने एक गोष्ट आपल्या मनात ठेवली होती. शाहरुखच्या आई जेव्हा आयसीयूमध्ये होती, तेव्हा त्याला वाटलं की जर त्यानं आईला त्रास दिला तर त्याची आई त्याला सोडूण जाणार नाही. यामुळे  शाहरुखने त्याच्या आईला सांगितले की, 'तो दीदीला खूप त्रास देईल, नोकरीही करणार नाही आणि इतके मद्यपान करेन की एक दिवस ती मद्याच्या आहारी जाईन'. 


हेही वाचा : KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!


शाहरुख म्हणाला होता की, 'त्याला वाटले की या गोष्टी ऐकून त्याची आई त्याला सोडणार नाही. पण तसे झाले नाही, त्याच्या आईचे निधन झाले. शाहरुख खानने मुलाखतीत सांगितले की, 'शेवटच्या क्षणी आईला असे बोलल्याचा त्याला नेहमीच पश्चाताप होतो.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या शाहरुख हा त्याचा पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज म्हणजे 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात आज 'पठाण'  प्रदर्शित होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहरुखच्या या सिनेमात शाहरुखशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी पट्ट्यातील सुमारे 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे, तर तामिळ आणि तेलुगू स्क्रीन्ससह सुमारे 5000 स्क्रीन्सवर तो रिलीज होणार आहे. 


मल्टिप्लेक्सवर जोरदार आगाऊ बुकिंग


शाहरुख खानचा हा सिनेमा जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग बनला आहे. याआधी 2022मध्ये, हृतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांचा बॉलीवूड सिनेमा “विक्रम वेधा” देखील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतातील आघाडीच्या मल्टिप्लेक्सवर जोरदार आगाऊ बुकिंग नोंदवले आहे, PVR ने जवळपास 500,000 तिकिटे आणि आयनॉक्सने सुमारे 275,000 तिकिटांची नोंद केली आहे. हा चित्रपट भारतभरात 10000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. किंग खानच्या 'पठाण' सिनेमाने रिलीज (Pathaan Movie) होण्याआधीच काही सिनेमांचे रेकॉर्ड मोडण्यास सुरुवात केली आहे.