मुंबई : प्रसिद्धी, ओळख, संपत्ती.... अभिनेता शाहरुख खानकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस आलेला शाहरुख खान कायम चर्चेत असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याचे जुने किस्से देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील शाहरुखच्या एका मुलाखतीबद्दल चर्चा होत आहे. या मुलाखतीत शाहरुखने 'मी Gay' नाही असं म्हटलं. 
 
दरम्यान मुलाखतीत शाहरुखला सिनेमांध्ये महिला कलाकारसोबत असलेल्या नात्याबद्दल शाहरुख म्हणाला, 'जुही, माधुरी, मनीषा, शिल्पा, सोनाली, नगमा आणि उर्मिला अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण यापैकी कोणासोबत बेडवर झोपलो नाही.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे शाहरुख म्हणला, 'मी अभिनेत्रींसोबत बेडवर झोपत नाही, याचा अर्थ असा नाही की मी Gay आहे. कोणतीही महिला तिच्या सौंदर्य, बुद्धी इत्यादी गोष्टीने पुरुषाला आकर्षित करते आणि या सगळ्या गोष्टी माझी पत्नी गौरीमध्ये आहेत. त्यामुळे मला दुसऱ्या मुलींच्या मागे धावायची काही गरज नाही.


शाहरुख म्हणाला, 'जुहीसोबत सिनेमा केल्यानंतर तिच्या आणि माझ्या नात्याची चर्चा होऊ लागली. म्हणून जुहीने माझ्यासोबत काम करणं बंद केलं.' असं देखील शाहरुख म्हणाला. लग्नानंतर अफेअरच्या चर्चांमुळे वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येतात. 


त्यामुळे यासर्व प्रकरणांवर स्पष्ट मत असणं फार गरजेचं असतं, पण फसवणूक करणं फक्त माणसाच्याच हातात असतं.. असं देखील शाहरुख याठिकाणी  म्हणाला.