मुंबई : सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. आणि या सेलिब्रिटींना ओळखण्याचं आव्हानही देण्यात येतं. पण यावेळी समोर आलेला फोटो काही वेगळाच आहे. या फोटोत एक सेलिब्रिटी कपल दिसत असून व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या कपलला ओळखण्याचं आव्हान दिलं जात आहे. बी-टाऊनची स्टायलिश अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते.  अनन्या पांडे ही बॉलिवूडची नवी फॅशनिस्टा बनली आहे. तिच्या स्टनिंग आणि ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये एक अभिनेत्री एका अभिनेत्यासोबत लिपलॉक करताना दिसत आहे. पण अभिनेत्रीने चतुराईने आपला चेहरा फोनवरून लपवला आहे. अभिनेत्रीने चतुराईने आपला चेहरा फोनने लपवला आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणत आहेत की हा फोटो अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आहे.


अनेक यूजर्सनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत हा फोटो अनन्या आणि आर्यन खानचा असल्याचं लिहिलं आहे.  तर कुणी म्हणतंय की हा फोटो मीरा राजपूत आणि शाहिद कपूरचा आहे. पण या फोटोत कोणते सेलिब्रिटी कपल आहे हे ओळखणं कठीण आहे. हा फोटो समोर आल्यानंतर यूजर्स म्हणत आहेत की या फोटोत आर्यन आणि अनन्या आहेत. सगळ्यांना माहित आहे की स्टारकिड्स सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे हे बेस्ट फ्रेंड आहेत.



त्यामुळे हा फोटो अनन्या आणि आदित्य रॉय कपूरचा असल्याचंही अनेकजण म्हणत आहेत. इतकंच नाही तर हा फोटो अनन्या आणि ईशान खट्टरचा असल्याचं अनेकजण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत आहेत.


अनन्या पांडेचा मोठा खुलासा
कॉफी विथ करण (Koffee With Karan) या शोमध्ये सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्या मैत्रीविषयी बोलल्यानंतर करण जोहरने अनन्याला विचारलं, तुमच्यापैकी कोणाचंही  सुहाना खानचा भाऊ आर्यन क्रश नव्हता का? यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, ''तो क्यूट आहे तो माझं क्रश होता.  यानंतर करण जोहरने विचारलं, पण मग क्रश झाल्यानंतरही तुमची लव्हस्टोरी का पुढे गेली नाही? अनन्या लगेच म्हणाली, ते तुम्ही आर्यनलाच विचारा.