Shahrukh Took Break From Movie Because Of Suhana : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखचे लाखो चाहते आहेत. गेल्या 4 वर्षांपासून शाहरुख हा मोठ्या पडद्यापासून लांब होता. शाहरुखनं मोठ्या पडद्यावर 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत पडद्यावर पुनरागमन केलं. आता एकामागे एक असे शाहरुखचे 'पठान' (Pathan) आणि 'जवान' (Jawan) असे 2 चित्रपट येणार आहेत. इतके दिवस शाहरुख चित्रपटांपासून लांब का होता त्याचं कारण त्याची लेक सुहाना खान (Suhana Khan) असल्याचं त्यानं स्वत: स्पष्ट केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखनं त्याचा आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच शाहरुख रेड सी-इंटरनेशनल फेस्टिवलमध्ये हजर होता. त्या दरम्यान, शाहरुख त्याच्या डेडलाइन विषयी बोलताना म्हणाला की त्याची लेक सुहानामुळे तो ब्रेकवर होता. याविषयी सांगताना शाहरुख म्हणाला, 'सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिकायला गेली होती, मी 8 महिने माझ्या मुलीच्या कॉलची प्रतिक्षा करत होतो. मी विचार केला की मी कोणताबी चित्रपट साइन करत नाही म्हणून ती कॉल करेल. पण एक दिवस मी तिला कॉल केला आणि म्हणालो मी कामाला सुरुवात करू का? त्यावर माझी लेकी म्हणाली की तू काम का करत नाही आहेस? मी म्हणालो, मला वाटलं की न्यूयॉर्कला गेल्यावर तुला एकटं वाटेल तर मला कॉल करशील...' 



शाहरुखनं मुलीच्या चिंतेत चार वर्षे काम केलं नाही. त्याला असं वाटायचं की जेव्हा पण सुहानाला घराची आठवण येईल तेव्हा त्याला लगेच तिच्याकडे  जाता यायला हवं. अशा परिस्थितीत काम आलं तर शुटिंगमध्येच सोडून सुहानाकडे जाणं शक्य होणार नाही, म्हणून त्यानं ब्रेक घेतला. 


हेही वाचा : 'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल



दरम्यान, यावेळी शाहरुखनं आणखी एक मोठा खुलासा केला आहे की त्याला पुढील 10 वर्षे अॅक्शन चित्रपट करायचे आहेत. त्याला 'मिशन इम्पॉसिबल' सारख्या टॉप अॅक्शन चित्रपटात काम करायचे आहे. यामुळेच शाहरुख  चार वर्षांच्या ब्रेकनंतर आता 'जवान' आणि 'पठाण' यांसारख्या चित्रपटांतून पुनरागमन करत आहे. (shahrukh khan take break from movie for daughter suhana pathan jawan)