शाहरूख खानने `या` सिनेमासाठी घेतलं एवढं मानधन; सलमान, अक्षयला टाकलं मागे
`झिरो` सिनेमाच्या अपयशानंतर शाहरूख `पठान` सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये कायम सिनेमांसाठी आणि प्रसिद्धीसाठी रस्सीखेच सुरू असते. या शर्यतीत आता किंग अभिनेता शाहरूख खान आघाडीवर आहे. शाहरूखचा 'पठान' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. सिनेमात अनेक ऍक्शन सीन देखील आहेत. सिनेमाच्या शुटींग दरम्यातील काही व्हिडिओ देखील लिक झाले, त्यानंतर सर्वत्र 'पठान' सिनेमाची चर्चा होती. शाहरूख खानने सिनेमासाठी चांगलचं मानधन घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्टने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाहरूख देखील आता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत आला आहे.
शाहरूखचे चाहते त्याच्या बहूचर्चीत 'पठान' सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. शहारूखने सिनेमासाठी 100 कोटी मानधन स्वीकारलं असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असल्यास शाहरूखने बॉलिवूडचे बडे स्टार सलमान खान आणि अक्षय कुमारला देखील मागे टाकलं आहे. त्यामुळे शाहरूखचा हा सिनेमा चाहत्यांचं किती मनोरंजन करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मात्र याबद्दल शाहरूख आणि सिनेमा निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. सांगायचं झालं तर, शाहरूखने सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. शिवाय सिनेमाचे अनेक ऍक्शन सीन बुर्ज खलीफा समोर चित्रीत करण्यात आले आहे. असं देखील सांगण्यात येत आहे, की सिनेमात अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि जॉन अब्राहम सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.
याव्यतिरीक्त सिनेमात अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं चित्रीकरण मुंबई, दुबई आणि अन्य विदेशी ठिकाणी करण्यात आलं आहे. 'झिरो' सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर शाहरूखच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.