शाहरूखची लेक सुहानाचा डेब्यू, चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
सुहाना खान कोणत्या चित्रपटाच्या मध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणार याच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात.
मुंबई : अभिनेता शाहरूखची मुलगी सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहे. त्याचबरोबर एका लघुचित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं पहिलं लूक प्रदर्शित करण्यात आलं होतं. लघुचित्रपटाच्या पहिल्या लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' असं लघुचित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचं टिझर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
खुद्द सुहानाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लघुचित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. Theodone Gimeno चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुहानाने लंडनच्या 'Ardingly College'मधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.