अभिनेत्याचे वादग्रस्त रेप सीन, 80 पेक्षा जास्त चित्रपटांमुळे भोगावे लागले परिणाम
600 अभिनेत्याचे वादग्रस्त रेप सीन, 80 पेक्षा जास्त चित्रपटांमुळे भोगावे लागले परिणाम
मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांनी 600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शक्ती कपूर यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका बजावल्या. अखेर बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख खलनायक म्हणूनचं राहिली. तर 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी रेप सीन दिले. रेप सीनमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले.
एक दिवस शक्ती कपूर त्यांचा चित्रपट आईला दाखवण्यासाठी सिनेमागृहात गेले. तेव्हा त्यांनी दिलेला रेप सीन पाहून त्यांच्या आईचा राग अनावर झाला. चित्रपट अर्धवट सोडून त्यांच्या आई सिनेमागृहातून बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर शक्ती कपूर यांना त्यांच्या आईने फटकारलं. त्यानंतर एक अशी वेळ आली सेन्सर बोर्डाने त्यांच्या चित्रपटांसाठी सिनेमागृहांचा मार्ग बंद केला.
1982 साली प्रदर्शित झालेल्या 'गुमसुम' चित्रपटातील त्यांनी दिलेला रेप सीन आजही चर्चेत आहे. तर दुसरीकडे 'मेरे आगोश' चित्रपटात देखील शक्ती कपूर यांनी अनेक वादग्रस्त सीन दिले. त्याचे हे सीन पाहून सेन्सर बोर्डाला देखील धक्का बसला. त्या चित्रपटावर सेन्सर बोर्डाने स्थगिती आणली. अनेक दिवसांनंतर अखेर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बोर्डाकडून परवानगी मिळाली.
त्यानंतर रेप सीनमुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2005 साली एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये शक्ती कपूर टीव्ही शोमध्ये रोल देण्यासाठी एका मुलीकडून शरीर सुखाची मागणी करताना दिसले होते.
शक्ती कपूर म्हणतात, 'इडस्ट्रीमध्ये असचं चालतं. आज ज्या अभिनेत्री यशस्वी झाल्या आहेत, त्यांनी देखील या गोष्टी केल्या आहेत.' एवढंच नाही तर, शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांनी 'द जर्नी ऑफ कर्मा' मध्ये हॉट आणि बोल्ड सीन दिले.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शक्ती कपूर यांच्यावर गंभीर आरोप झाले. बोल्ड सीन करताना शक्ती इतका उत्तेजित झाला होता की अभिनेत्रीला वाटलं की तो रील नाही रियल बेडरूम सीन करत आहे.