मुंबई : ९०च्या दशकात टीव्हीवर एक अशी मालिका टीव्हीवर दाखवली जायची जी लहानांपासून मोठ्यांनाही पसंत होती. ती म्हणजे शक्तीमान. शक्तीमान भारतातील पहिला सुपरहिरोही मानला जातो. या मालिकेचे तब्बल ५२० एपिसोड झाले होते. त्यावेळी या मालिकेचा टीआरपी इतका होता की सध्याचे टीव्ही सीरियल्स याची बरोबरीच करु शकत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत लोकांचा सुपरहिरो असलेल्या शक्तीमानाला अनेक खलनायक खूप त्रास द्यायचे. यातील एक मुख्य खलनायक म्हणजे डॉ. जैकाल. आज इतक्या वर्षानंतरही शक्तीमान मालिकेतील सर्वच पात्रे लोकांच्या लक्षात आहेत. 


शक्तीमानमधील तमराज किलविशनंतर सगळ्यात मोठा खलनायक डॉ. जैकाल. ललित परिमू यांनी ही भूमिका साकारली होती. 


१९९७मध्ये शक्तीमान सुरु झाल्यानंतर ललित यांचे नशीबच बदलले. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. हजार चौरासी की मां, हम तुम पर मरते हैं, एजेंट विनोद आणि २०१३ मध्ये आलेली हैदर. हैदर या सिनेमात त्यांनी शेवटचे काम केले. 


ललित परिमू यांनी ‘मैं मनुष्य हूं’या नावाचे पुस्तकही लिहिले. थिएटर तसेच  १००हून अधिक टीव्ही सीरियल्समध्ये काम करणारे ललित परिमू सध्या अॅक्टिंग अॅकॅडमी चालवतात.