मुंबई : अभिनेत्री शालू चौरसिया नुकतीच अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्याची शिकार झाली आहे. या हल्ल्यात त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला मारहाणही करण्यात आली. शालू रविवारी रात्री टोनी बंजारा हिल्स येथील केबीआर पार्कजवळ पायी चालत जात असताना रात्री 8.30 वाजता तिच्यावर हल्ला झाल्यानंतर तिचा मोबाईल हिसकावण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्कमध्ये अभिनेत्रीवर हल्ला
अभिनेत्रीने सांगितलं की, तिने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, एका व्यक्तीने तिला प्रथम तिचे पैसे आणि मौल्यवान वस्तू देण्यास सांगितले आणि जेव्हा त्यांनी विरोध केला तेव्हा त्यांनी तिच्या चेहऱ्यावर बुक्का मारला. एवढंच नाही तर तिच्यावर दगडानेही वार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोरानं तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला.


चेहऱ्याची अशी अवस्था
अभिनेत्रीच्या डोक्याला आणि डोळ्यांना दुखापत झाली असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून बंजारा हिल्स पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहेत. याआधीही या गार्डनमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत.


यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत
प्रसिद्ध व्यक्ती, बिझनेमन आणि राजकीय नेते विस्तीर्ण केबीआर पार्कमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी वॉकसाठी येतात. 2014 मध्ये, अरबिंदो फार्माचे कार्यकारी के नित्यानंद रेड्डी पार्कमध्ये फिरत असताना आणि त्यांच्या कारमध्ये बसले असताना एका व्यक्तीने AK-47 ने गोळीबार केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते.