मुंबई : अभिनेत्री शमा सिकंदरने आपल्या अभिनयाची जादू टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत चालवली आहे. मात्र, ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.  शमाही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो शेअर करुन शमाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.  जवळपास दररोज नवनवीन फोटोशूटमुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात येते. आता तिचा नवा लूक पुन्हा चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमाने सिझलिंग लूक दाखवला
शमाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलच्या काठावर बसलेली दिसत आहे. यामध्ये अभिनेत्रीने अॅनिमल प्रिंट असलेला स्विमसूट घातला आहे. फोटोमध्ये शमाची बॅकसाइड दिसत आहे. याचबरोबर तिने तिच्या चेहऱ्याचा साइड लूक दाखवला आहे. याचबरोबर आपला लूक पुर्ण करण्यासाठी तिने केसांचा बन बनवला आहे. आणि वरच्या बाजूला बांधला आहे. या फोटोत शमा खूपच हॉट दिसत आहे.



वयाच्या ४० व्या वर्षीही शमा फिट आहे
या फोटोत शमा खूपच फिट दिसत आहे. तिला पाहून ती 40 वर्षांची आहे असं म्हणता येणार नाही. शमाने आजही स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना तिच्याकडून प्रेरणा मिळत राहते. या फोटोतही शमाच्या कर्व्स फिगरने लक्ष वेधून घेतलं आहे.