मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शमा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या शमा ही ग्रीसमध्ये आहे. तेथे शमा तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. ४ ऑगस्ट रोजी शमाचा वाढदिवस होता. शमानं पतीसोबत रोमॅन्टिक पद्धतीनं तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, शमानं सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शमानं नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. शमाने जे फोटो शेअर केले आहेत त्यात ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. शमानं डीप नेक असलेली मोनोकिनी परिधान केली आहे. शमा समुद्र किनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. शमानं नेकलेस आणि ईयररिंग्स घातले आहेत. 



शमाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. शमाचे हे फोटो काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. त्यांनी या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर काहींना शमाला ट्रोल केले आहे. यासगळ्यात अशा देखील कमेंट आहेत ज्यात शमा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जाते. नेटकऱ्यांनी कमेंट करत ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न केला आहे.