मुंबई : शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री अनेकदा पार्टीत स्पॉट होते, नुकतीच ती एका पार्टीत स्पॉट झाली. आणि यावेळी ती  हेडलाइन्सचा भाग बनली. खरंतर, शमिताचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अभिनेत्री पार्टीतून बाहेर येताच अचानक आमिर अलीने तिला आपल्या मिठीत घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने शमिताला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर नेलं आणि तिला तिच्या गाडीपर्यंत सोडलं. आमिरला अचानक पाहून अभिनेत्रीही आश्चर्यचकित झाली, शमिता आणि आमिरच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक विचित्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.


व्हायरल होत असलेला शमिताचा हा व्हिडिओ आशिष चौधरीच्या वेडिंग एनिव्हर्सरी पार्टीचा आहे. वांद्रे येथील आशिषच्या घरी ही पार्टी करण्यात आली. पार्टीत शमिता व्यतिरिक्त आमिर अली, जेनिफर विंगेट आणि अनेक टीव्ही स्टार्स दिसले. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, मात्र शमिताच्या व्हिडिओने सर्वांचीच लाइमलाइट मिळवली.


चाहत्यांच्या प्रतिक्रिया
शमिता शेट्टीसोबतचे आमिरचं वागणे युजर्सना थोडे विचित्र वाटलं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. शमिता पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हे किती दिवस चालेल? एक महिना?' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'शमिता त्याला डेट करत आहे का? ही आंटी सुधारणार नाही. या दोघांना एकत्र पाहून काही युजर्सही खूश आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, 'नव्या अध्यायाची सुरुवात.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शमिताचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शमिता बऱ्याच दिवसांपासून कामापासून गायब आहे. पण नुकताच तिच्या 'द टेनंट' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. हा ट्रेलर पाहून ही अभिनेत्री पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'द टेनंट' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी शमिता 'बिग बॉस'मध्ये दिसली होती, तिथून तिचे आणि राकेश बापटचं नातं सुरू झालं. मात्र काही काळानंतर दोघही वेगळे झाले.