Shanaya Kapoor Rampwalk Troll : बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची लाडकी लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. शनाया नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. तिनं रॅम्प वॉक केला आहे. शनायाचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कोणी तिला प्लास्टिकची बाहुली म्हटलं आहे तर कोणी सोनम कपूरपेक्षा चांगली आहे असं म्हटलं आहे. (Shanaya Kapoor Rampwalk)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनायानं तिचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी शनायानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर त्यासोबत तिनं ट्यूब ब्लाऊज परिधान केलं आहे. शनायानं डिझायनर अर्पिता मेहतासाठी हे रॅम्पवॉक केलं होतं. शनाया अर्पिताची शो स्टॉपर होती. हा व्हिडीओ शेअर करत तिनं अर्पि म्हणजेच अर्पिता असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. 



शनाया ही 23 वर्षांची आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शनायानं वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. नेहमी प्रमाणे करण जोहरवर स्टार किड्सला लॉन्च करतो. तर शनाया बेधड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.