Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं मुख्य भूमिका साकारलेला चित्रपट म्हणजे ‘सौगंध’. हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत त्याची हीरोइनची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री शांतिप्रियानं साकारली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक कमाई केली. पण हा चित्रपट चर्चेत येण्याचं कारण हे शांतिप्रियानं केलेले काही खुलासे. शांतिप्रियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयनं तिच्या करिअरविषयी काय वक्तव्य केलं होतं ते सांगितलं आहे. याशिवाय शांतिप्रियानं अक्षय कुमारला हार्ड वर्किंग आणि शिस्तप्रिय म्हटलं पण त्यासोबत जेव्हा त्याच्याकडे मदत मागितली तेव्हा तो कशा प्रकारे तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला याविषयी देखील सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलीवुड ठिकाना' ला दिलेल्या मुलाखतीत शांतिप्रियानं अक्षय कुमारसोबत काम करण्याच्या काळाविषयी सांगितलं आहे. शांतिप्रिया यावेळी म्हणाली की तिनं अक्षय कुमारकडे काम मागितलं होतं. पण कधीच अक्षयनं तिच्या मेसेजवर रिप्लाय दिला नाही. त्यानं केलेल्या या कृत्यानं तिला खूप वाईट वाटलं. शांतिप्रियानं त्यावेळचा किस्सा सांगितला की कशा प्रकारे ती 'हॉलिडे: ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी' च्या सेटवर भेटली होती. 



शांतिप्रिया प्रियानं खुलासा केला की अक्षयनं तिची भेट घेतली होती. त्यानंतर जेव्हा तिनं काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यानं विचित्र कमेंट केली. अक्षय म्हणाला की ती आता देखील तशीच दिसते. पण ती आता कोणत्या अभिनेत्रीची भूमिका साकारू शकतं नाही. शांतिप्रिया म्हणाली, "जेव्हा मी त्याला हॉलिडेच्या सेटवर भेटली, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला परत अभिनय करायचा आहे. त्यानं मला विचारलं की मी कशी आहे. माझी मुलं कशी आहेत. त्यावेळी आम्ही जवळपास अर्धातास गप्पा मारत होतो."


हेही वाचा : Mahesh Babu च्या 11 वर्षाच्या लेकीनं दान केलं जाहिरातीतून मिळालेलं पहिलं मानधन!


त्यानंतर सोनाक्षी सिन्हाशी ओळख करून दिली हे सांगत शांतिप्रिया म्हणाली, "अक्षयनं लंच ब्रेकमध्ये माझी आणि सोनाक्षीची ओळख करुन दिली. त्यानं सोनाक्षीला सांगितलं की मी त्याची पहिली अभिनेत्री आहे. त्यामुळे मी तेव्हा सांगितलं की मला पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात यायचं आहे. त्यामुळे जर कोणता चांगला प्रोजेक्ट असेल तर मला कळवा. यावर अक्षयनं सांगितलं की ती आधी सारखीच दिसते. पण त्यासोबत सांगितलं की तुला माहित आहे का एका हिरोइनची भूमिका नाही साकारू शकत." अक्षयनं शांतिप्रियाला सांगितलं की लग्नानंतर चित्रपटसृष्टीत महिलांना तशी वागणूक दिली जात नाही. त्यानंतर तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शांतीनं सांगितलं की मुंबईत राहते आणि तिची मुलं देखील इथेच आहेत. त्यामुळे ती तिथे जाऊ शकत नाही.