मुंबई : अॅमेझॉन प्राइमवरील सगळ्यात हिट वेब सिरीज 'द फॅमिली मॅन'. या सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता शरद केळकरने अरविंदची भूमिका साकारली आहे. या सिरीजमध्ये अरविंद मनोज बाजपेयी यांची पत्नी असलेल्या सुचीचा मित्र असल्याचं दाखविण्यात आलं आहे. मेकर्सने थोडी हिंटही दिली आहे की, अरविंद सुचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद केळकरला येतायेत धमक्या
अलीकडेच एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद केळकरने सांगितलं की, 'द फॅमिली मॅन' मधील त्याच्या भूमिकेमुळे त्याला जिवे मारण्याची धमकी येऊ लागली आहे. शरद म्हणाला, 'मला असे मॅसेज दररोज येतात की, श्रीकांत आणि सुची यांच्यामध्ये तुम्ही येऊ नका. नाहीतर तुला ठार मारु अशा अनेक प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आता मला याची सवय झाली आहे.


काय आहे शोची स्टारकास्ट?
चाहत्यांच्या मनात या शोविषयी सगळ्या प्रकारचे सिद्धांत असल्याचं शरद म्हणाला. फॅमिली मॅनचा पहिला सीझन सुपरहिट होता, त्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन आणला. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, सामन्था अक्केनेनी, प्रियामणि, दर्शन कुमार, आसिफ बसरा आणि गुल पनाग अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.


काय आहे मनोजची भूमिका?
'फॅमिली मॅन' मध्ये मनोज बाजपेयीने एका गुप्तहेर एजंटची भूमिका साकारलीये. जी आपल्या कुटुंबासाठी आणि व्यावसायिक जीवनात सतत झुंज देत असते. सिरीजमध्ये एक गंमत आहे तसंच जबरदस्त अ‍ॅक्शन दाखवण्यात आले आहेत. सिरीजमध्ये कॉमेडी-अॅक्शनचे हे संयोजन चाहत्यांनीही पसंत केलं आहे.