Sharad Pawar Satyashodhak : सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्यात बॉक्स ऑफिसवर असलेली शर्यत आपल्याला पाहायला मिळते. मात्र, त्यातही काही चित्रपट आहेत जे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर अर्थात त्यांच्या संघर्षावर आधारीत असलेला 'सत्यशोधक' चित्रपट. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे त्यांच्या पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले. त्यावेळी त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सत्यशोधक' चित्रपटाच्या अधिकृत फेसबूक पेजवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी फोटो आणि व्हिडीओ दोन्ही शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की 'अतिशय उत्तम चित्रपट आहे. महात्मा फुलेंचे जे आयुष्य आहे, त्यांचे आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आहेत, ते वास्तव रूपाने या ठिकाणी लिहिले, मला स्वतःला असं वाटतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला पाहिजे. राज्य सरकारला ही विनंती'. 



त्याशिवाय या शरद पवार यांचा चित्रपट पाहतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपट पाहत असताना शरद पवार भावूक झाल्याचे म्हटले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील दिसत आहे. 



दुसरीकडे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांचे म्हणणे होते की महात्मा फुलेंचे जे विचार आहेत आणि त्यासोबत त्यांनी जे काम केलं आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारनेही चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. त्यानंतर राज्य सरकारनं हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. 


हेही वाचा : 'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी


या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर निलेश जळमकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे. अभिनेता संदीप कुलकर्णी यांनीमहात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडेनं सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. त्या दोघांशिवाय गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ यांनी