'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी

Hrithik Roshan Sussanne Khan Video : हृतिक रोशन आणि सुझैन खानचा हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 15, 2024, 02:34 PM IST
'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan Sussanne Khan Video : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान यांची जोडी ही एकेकाळी प्रेक्षकांची आवडती जोडी होती. सुझैन खानला पाहताच हृतिक तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर लगेच त्यांनी 2000 मध्ये लग्न केलं. मात्र, 14 वर्षांचा सुखी-संसार केल्यानंतर 2014 मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ते दोघं विभक्त झाले असले तरी देखील एकत्र येऊन ते त्यांच्या मुलांचा सांभाळ करत होते. 

एकीकडे अनेक कपल्स आहेत जे विभक्त झाल्यावर एकमेंकांच तोंड पाहत नाहीत. दुसरीकडे हृतिक आणि सुझैन आहेत जे आजही एकत्र आल्यावर आनंदानं राहतात. त्यांच्यातली मैत्री संपलेली नाही. त्यांच्यात असलेलं हे सुंदर बॉन्डिंग त्यांच्या चाहत्यांना फार आवडतं. सध्या त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात सुरुवातीला हृतिक येतो आणि सुझैनला पाहुन आनंदी होतो आणि लगेच तिला मिठी मारतो. त्यानंतर सुझैन त्याची एका व्यक्तीशी ओळख करुन देते. त्या दरम्यान, ते गप्पा मारताना दिसतात. मग सुझैन हृतिकचे फोटो काढताना दिसते. सुझैन फक्त एक नाही तर हृतिकचे अनेक फोटो क्लिक करते. सुझैन आणि हृतिकच्या आउटफिटविषयी बोलायचे झाले तर सुझैन ही ऑल-डेनिम आऊटफिटमध्ये दिसते. तर हृतिक रोशननं निळ्या रंगाचं टी-शर्ट, डेनिम पॅन्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर, हृतिक आणि सुझैनची भेट एका फॅशन शो दरम्यान, झाली होती. दोघांनी आनंदानं एकमेकांची भेट घेतली. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'हे दोघं एकत्रच चांगले दिसतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्या दोघांनी परत एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. ते दोघं एकत्र चांगले दिसतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भेटण्याची पद्धत एकदम कॅज्युअल आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'एवढी सुंदर पत्नी असताना तो दुसरीच्या मागे पडलाय.'

हेही वाचा : 'घाणेरडं बाथरुम आणि जेवणाच्या नावावर...';जेलमध्ये काढलेल्या दिवसांत रियाला आला धक्कादायक अनुभव

दरम्यान, हृतिक रोशनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याचाकडे वॉर या चित्रपटाचा सीक्वल देखील आहे.